पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थांवर पंचप्रहार; पाच जण गजाआड, दीड किलोहून अधिक गांजा जप्त

काशिनाथ शिंदे   :पिंपरी-चिंचवड शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत धडक कारवाया करत पाच आरोपींना अटक केली आहे. रहाटणी, नेहरूनगर, निगडी, रावेत आणि नवलाख उंबरे येथे करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये १.६ किलोहून अधिक गांजा, एमडी सदृश्य अंमली पदार्थ तसेच रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काळेवाडी पोलिसांनी रहाटणीतील कोकणे चौक परिसरात सापळा रचून १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १.९२ ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त करण्यात आली असून एकूण १६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

संत तुकारामनगर पोलिसांनी नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात कारवाई करून ३२६ ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली. या कारवाईत सुमारे १६ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

निगडी पोलिसांनी भक्तीशक्ती चौक अंडरपास परिसरात ४९.२७ ग्रॅम गांजाची वाहतूक करणाऱ्या एका युवकाला पकडले. त्याच्याकडून २ हजार ४५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने रावेत येथील हॉटेल गावकरी थाटसमोर कारवाई करत २२१ ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली. या प्रकरणात ११ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी नवलाख उंबरे-बधलवाडी रोडवरील मुक्ताई मंदिराजवळ छापा टाकून १ किलो ७ ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम मिळून ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

See also  वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!