वानवडीत पहाटे पोलिस-सराईत आरोपी आमनेसामने; स्वसंरक्षणार्थ पोलिसांची गोळी, करण सिंग जखमी

काशिनाथ  शिंदे.पुणे, दि. २२ जून : वानवडी परिसरात रविवारी पहाटे पोलिस आणि सराईत आरोपी यांच्यात झालेल्या थरारक चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ झाडलेल्या गोळीने आरोपी करण सिंग जखमी झाला. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असून संबंधित पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करण सिंग याच्यावर ३० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला पकडण्याची तयारी केली होती.

पहाटे सुमारे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने पोलिसांवर अग्निशस्त्रातून गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. या गोळीबारात करण सिंग जखमी झाला.

घटनेनंतर जखमी आरोपीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून घटनेमागील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

See also  देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान