जेजुरीत पर्जन्य याग उत्साहात; देशभर सुवृष्टीसाठी प्रार्थना

काशिनाथ  शिंदे  जेजुरी, दि. २२ जून : श्री क्षेत्र जेजुरी येथे पर्जन्य सेवा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. “२० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात देशभर चांगला पाऊस पडून भारतभूमी सुजलाम-सुफलाम व्हावी, यासाठी श्री खंडेरायाच्या चरणी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले.

परमपूज्य गुरूमाऊली, युवासंत चंद्रकांत दादासाहेब, नितिनभाऊ व आबासाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच पुणे जिल्हा प्रेरणास्थान सतिशदादा मोटे आणि गुरुकन्या पल्लवीताई मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग आणि पर्जन्य याग मोठ्या श्रद्धाभावाने संपन्न करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित सेवेकऱ्यांना सतिशदादा मोटे यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे जिल्ह्यासह राहुरी, श्रीगोंदा आणि कोकण विभागातील अनेक सेवेकरी या पर्जन्य सेवेत सहभागी झाले होते. सेवेकऱ्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे कार्यालयातील दोन्ही सभागृहे पूर्ण भरली होती. तसेच व्हरांडा आणि वधू-वर कक्षातही उपस्थितांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आयोजकांनी या उपक्रमाला भविष्यात राष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, पर्जन्य सेवा संपन्न झाल्यानंतर परतीच्या प्रवासात अनेक सेवेकऱ्यांनी पावसाचा अनुभव घेतल्याने त्यांनी या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

See also  ४६ वर्षांची भगवी निष्ठा! वादळे आली, फितुरी झाली... पण रमेशभाऊंनी विचारांचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान