घायवळ टोळीला मोठा धक्का; दोन सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात

काशिनाथ   शिंदे .पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून : पुणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसला असून टोळीशी संबंधित असलेल्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी पुणे शहरातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकांमार्फत तपास सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी घायवळ टोळीशी संबंधित असून त्यांच्या अटकेमुळे टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांचे मत आहे. तसेच या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

या कारवाईमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

See also  "मोशीकरांवर कचऱ्याचा अन्याय थांबवा; प्रत्येक प्रभागात 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प उभारा!" – निखिल बोऱ्हाडे यांचा महापालिकेला सज्जड इशारा
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान