कल्याणमध्ये रस्त्यावर वाहनचालक चाचणी; ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचा तीव्र निषेध

महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; आरटीओच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी

 

 

 

 

 

काशिनाथ शिंदे

कल्याण : कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि टिटवाळा परिसरातील नागरिकांच्या वाहनचालक चाचणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरटीओ प्रशासनाकडून रस्त्यावर उघड्यावर वाहनचालक चाचणी घेतली जात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी केला आहे. याबाबत संघटनेच्या उपाध्यक्ष ज्योती रवी माळेकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांना स्मरणपत्र देत तीव्र निषेध नोंदविला आहे.

कल्याण येथील आरटीओ कार्यालयासाठी शासनाने सुमारे १० कोटी ४६ लाख २५ हजार ९४२ रुपये खर्च करून तीन एकर जागेत सुसज्ज कार्यालय उभारले आहे. मात्र, या तीन एकर जागेपैकी ८२२० चौरस मीटर जागेवर बांधकाम असून उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने जागा अपुरी पडत असल्याचे आरटीओ प्रशासनाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे रस्त्यावर उघड्यावर वाहनचालक चाचणी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आरटीओच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाले असल्याचे प्रशासनानेच मान्य केले असेल, तर हे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली जागा अतिक्रमणधारकांच्या ताब्यात राहणे योग्य नसल्याचेही संघटनेने पत्रात म्हटले आहे.

नांदिवलीतील स्वयंचलित चाचणी केंद्राला विलंब

आरटीओ प्रशासनाने नांदिवली येथे स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गिका (एडीटीटी) उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, हे केंद्र उभारण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असा दावा संघटनेने केला आहे. तोपर्यंत हजारो महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उन्हात-पावसात रस्त्यावर उभे राहून चाचणीसाठी प्रतीक्षा करायची का, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

See also  पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; महापालिका तिजोरीत ६१० कोटी जमा!

सध्या ज्या ठिकाणी वाहनचालक चाचणी घेतली जाते, तेथे पिण्याचे पाणी, सावलीसाठी आसरा आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची, विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.

अतिक्रमण हटवा किंवा तात्पुरत्या सुविधा द्या

संघटनेने प्रशासनासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणून आरटीओच्या तीन एकर जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून त्याच आवारात वाहनचालक चाचणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आवारात स्वच्छतागृह आणि नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

अतिक्रमण तातडीने हटविणे शक्य नसल्यास नांदिवली येथील स्वयंचलित चाचणी केंद्र तयार होईपर्यंत सध्या चाचणी घेतल्या जाणाऱ्या ठिकाणी पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आणि नागरिकांसाठी मंडपाची तात्पुरती व्यवस्था करावी, अशी दुसरी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास संघटनेला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांच्याकडेही पाठविण्यात आल्या आहेत.

  • Related Posts

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे…

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी