सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

काशिनाथ शिंदे

चिखली : मोरेवस्ती, चिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सौ. निर्मला जाधव, संस्थेचे सचिव श्री. मारुती जाधव, नगरसेवक कुंदन गायकवाड, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जाधव यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश देत गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते सादर केली. ‘चले जाव’ आंदोलन, दांडी यात्रा तसेच स्वातंत्र्यलढ्यातील विविध आंदोलनांची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून विशद केली.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. या उपक्रमाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी
  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर