ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी

पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारितील मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालक व मालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी शहर वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद शंकरराव वरखडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वरखडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिकृत परिपत्रक काढून सर्व मान्यता प्राप्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालकांना बैठकीची पूर्वसूचना द्यावी. त्यानंतर सर्व संबंधितांची बैठक घेऊन ड्रायव्हिंग स्कूल व्यवसायासंदर्भातील विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा.

याशिवाय, बैठकीत प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल मालकाला आपली भूमिका व समस्या मांडण्याची संधी मिळावी आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या मागणीची तातडीने दखल घेत सर्व ड्रायव्हिंग स्कूल मालकांची बैठक बोलावून त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढावा, अशी अपेक्षा ड्रायव्हिंग स्कूल चालक व मालकांकडून व्यक्त केली जात आहे.

See also  सहा तासांत खुनाच्या प्रयत्नाचा छडा; सहा आरोपींसह विधीसंघर्षित बालक ताब्यात
  • Related Posts

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती