अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘साहित्यरत्न दौड २०२६’; दोन हजारांहून अधिक धावपटू धावणार!

काशिनाथ शिंदे : पिंपरी

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रथमच भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक सलोखा, आरोग्यदायी जीवनशैली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या भव्य दौडीच्या यशस्वी नियोजनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नुकतीच महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. स्पर्धेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि धावपटूंसाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

शहरभरातील दोन हजारांहून अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली असून, ही स्पर्धा २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी बडबॅली उद्यान चौक, शाहूनगर, चिंचवड येथून उत्साहपूर्ण वातावरणात सुरू होणार आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘साहित्यरत्न दौड २०२६’ शहराच्या क्रीडा आणि सांस्कृतिक इतिहासातील एक संस्मरणीय उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

See also  ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या अडचणींवर तोडगा कधी? विनोद वरखडे यांची आरटीओकडे तातडीच्या बैठकीची मागणी
  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!