आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

काशिनाथ शिंदे : मुंबई

आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

‘शिक्षकदूत’ मंगेश चिवटे यांनी मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. आझाद मैदानावरील आंदोलनावेळी महिन्याभरात बैठक घेण्याचे देण्यात आलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मंगेश चिवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे निवेदन शिक्षणमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी पुण्यात सुरू असलेल्या क्रीडा शिक्षकांच्या आंदोलनाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. क्रीडा शिक्षकांच्या न्याय्य मागण्या त्वरित मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही मंगेश चिवटे यांनी केली.

यावर सकारात्मक भूमिका घेत शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “शिक्षक किंवा क्रीडा शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. आझाद मैदानात दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल.”

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, तुकडोजी महाराज राहते, सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, दीपक पाटणे, किरण कोरे, गौरव ताकटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

See also  पिंपरी चिंचवड महोत्सव पुन्हा नव्या दिमाखात; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग
  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!