‘वाहनचोरांची टोळी गजाआड!’ चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करत वाहन चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून २ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राज संतोष बापर्डेकर (वय २३, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) आणि शंकरसिंगसमंदरसिंगटाक(वय१८,रा. गाडीतळ, हडपसर) अशी आहेत. दोघांकडे सखोल चौकशी केली असता चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले वाहन चोरीचे पाच गुन्हे त्यांनी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी या कारवाईत चिखली पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४१०, ४९८, ४७२, ४७४ आणि ३२२/२०२६ हे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असलेले पाचही गुन्हे उघडकीस आणले.

तपासात आरोपी राज बापर्डेकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी १२वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर शंकरसिंग टाक हा देखील सराईत गुन्हेगार असून तो हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चार गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे तपासात समोर आले.

सध्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

See also  "उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात 'हरित संकल्प'; वृक्षारोपण, दुग्धाभिषेक आणि महाआरतीने व्यक्त केल्या शुभेच्छा"
  • Related Posts

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    देहूगावातील वृद्धाश्रम, अनाथ आश्रमाला अन्नदान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूगाव : वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत…

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य तपासणीसोबत आवश्यक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व, श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!