दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वाकड पोलिसांकडून ६१ वर्षीय आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे : वाकड

पिंपरी-चिंचवड, : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताथवडे परिसरात १० वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ६१ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार वर्षांच्या दुसऱ्या चिमुरडीशीही गैरवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला (वय ३०, रा. ताथवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमजान बन्नूसाब बागवान (वय ६१, रा. ताथवडे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने ताथवडे येथील आपल्या घरात तक्रारदाराच्या १० वर्षीय मुलीला जबरदस्तीने नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तसेच तक्रारदाराच्या चार वर्षीय मुलीलाही जबरदस्तीने घरात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे, पोक्सोकायदा २०१२ तसेच अनुसूचित जातीअनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बालकांवरील अत्याचार किंवा संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

See also  चिखलीत ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; एमडीसह चार वाहने-मोबाईल जप्त, चौघे गजाआड
  • Related Posts

    ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि हक्कांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

    ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान