पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले; नागरिकांच्या तक्रारींवरून अधिकाऱ्यांना खडसावले!

काशिनाथ   शिंदे  :चिंचवड येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत माजी नगरसेविका पल्लवी सुधीर वाळ्हेकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात आयोजित बैठकीत कनिष्ठ अभियंता साधना ठोंबरे व संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत नागरिकांच्या अडचणींबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

बैठकीदरम्यान परिसरातील अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पुरवठा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

पल्लवी वाळ्हेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश देत समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांना दिलासा मिळावा आणि पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आ:हे.

See also  १० दिवसांचा सीसीटीव्ही तपास अन् अट्टल घरफोड्या टोळी जेरबंद! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, ₹१०.३४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान