१० दिवसांचा सीसीटीव्ही तपास अन् अट्टल घरफोड्या टोळी जेरबंद! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, ₹१०.३४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

काशिनाथ शिंदे : वाकड पिंपरी चिंचवड

वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून, घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत ९७.८५ग्रॅमसोन्याचेदागिने असा एकूण ₹१० लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष चौक, वाकड येथील एका बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹७.२० लाखांचे सोन्याचे दागिनेरोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपास पथकाने तब्बल १० दिवसांतील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे १५ जुलै रोजी इराणी कॅफे, वाकड परिसरातून अतुल ऊर्फ आट्या चंद्रकांत आमले (३०) याला अटक करण्यात आली. त्यानंतर मोहन ऊर्फ आबा जनार्दन मुजमुले (३८), भीमराव बाबुराव गंगावणे (३८) आणि रामेश्वर लिंबाजी उपल्ले (२४) या त्याच्या साथीदारांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे आणखी पाच गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून ९७.८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून, जप्त ऐवजाची एकूण किंमत ₹१०.३४ लाख इतकी आहे.

तपासादरम्यान मुख्य आरोपी अतुल ऊर्फ आट्या आमले हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर येथे मिळून ४४ गुन्हे दाखल आहेत. त्याने आणखी काही घरफोड्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

ही उल्लेखनीय कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे तसेच तपास पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

See also  मोशी दुर्घटना : प्रत्येक कामगाराचा जीव अमूल्य; बचावकार्याला अधिक गती देण्यासाठी मंत्री गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी दाखल
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!