विनोद वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे वाहनधारकांना दिलासा; रखडलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे

काशिनाथ शिंदे पिंपरी : राज्यभर सुरू असलेल्या आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि एजंट यांची मोठी गैरसोय होत असताना, या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आरटीओमधील संपामुळे वाहन नोंदणी, हस्तांतरण, वाहन परवान्यांचे नूतनीकरण, परमिट नूतनीकरण, वाहन कर भरणा तसेच खटला विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. परिणामी, वाहनधारकांना वारंवार आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक महत्त्वाची कामे रखडल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या पार्श्वभूमीवर विनोद वरखडे यांनी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन आयुक्त, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन संपाबाबत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असतील, तर शासनाने त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा; मात्र सामान्य वाहनधारकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.

 

वरखडे यांच्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर अखेर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आरटीओ कार्यालयांमधील कामकाज लवकरच पूर्ववत होणार असून, रखडलेली कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

संप मागे घेतल्याने सामान्य वाहनधारक, परिवहन व्यावसायिक आणि एजंट यांनी समाधान व्यक्त केले आहे.

See also  ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!