ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड

काशिनाथ  शिंदे  पुणे,  : कात्रज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यासाठी थांबवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला करून ई-चलन मशीन व मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील नवीन पीएमटी बसथांब्याजवळ ही घटना घडली. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना वडगाव बुद्रुक येथील सदानंद कोंडिबा साळुंखे (वय ४५) हा दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी संबंधित दुचाकीस्वाराला थांबवून वाहतूक नियमभंगाबाबत कारवाई सुरू केली असता त्याने संतापाच्या भरात पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. त्यानंतर हेल्मेटने हल्ला करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच ई-चलन मशीन आणि मोबाईलची तोडफोड करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि शासकीय कामात होणारा हस्तक्षेप ही चिंतेची बाब असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

See also  डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान