राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी पुण्यात प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ स्थलांतर, कर्जबाजारीपणा आणि कृषी कुटुंबांच्या स्थितीचा अभ्यास; धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित होणार

पुणे : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्य संचालनालय, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या (एनएसएस) ८१ व्या फेरीसाठी चार दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरास मंगळवारपासून प्रारंभ झाला. १६ ते १९ जूनदरम्यान आयोजित या शिबिरात स्थलांतर विषयक सर्वेक्षण, अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण तसेच कृषी कुटुंबांच्या स्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त संचालक डॉ. रुही कुलकर्णी, प्रादेशिक संयुक्त आयुक्त सुषमा जाधव आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीसाठी अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्वेक्षणाची रूपरेषा, माहिती संकलन पद्धती, क्षेत्रीय कार्यपद्धती आणि सांख्यिकीय मानकांचे काटेकोर पालन यावर प्रशिक्षणात भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुषमा जाधव यांनी ग्रामीण व शहरी भागातून संकलित होणारी माहिती राष्ट्रीय धोरणे आणि लोककल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. सहाय्यक संचालक वेदांत कोंडकर यांनी या सर्वेक्षणांमुळे देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे वास्तव चित्र समोर येत असल्याचे सांगितले.

१ जुलैपासून सुरू होणाऱ्या क्षेत्रीय कामकाजाच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणांतून कुटुंबांची मालमत्ता, कर्जे, गुंतवणूक, कृषी उत्पन्न, शेती पद्धती, स्थलांतराची कारणे, रोजगारस्थिती आणि सामाजिक-आर्थिक परिणाम याबाबतची विश्वासार्ह माहिती संकलित केली जाणार आहे.

सर्वेक्षणासाठी कुटुंबांची निवड वैज्ञानिक नमुना पद्धतीने करण्यात येणार असून प्रशिक्षित प्रगणक संगणकीय अनुप्रयोगयुक्त टॅब्लेटच्या साहाय्याने माहिती गोळा करणार आहेत. नागरिकांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने केले आहे. संकलित माहिती पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले

See also  ई-चलन कारवाईचा राग; कात्रजमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हेल्मेटने हल्ला, शासकीय साहित्याची तोडफोड
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!