जगात कासारवाडीच्या PCMC शाळेचा डंका! World’s Best School Prizes 2026 मध्ये Top 10 मध्ये मानाची नोंद

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील PCMC छत्रपती शाहूजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करत UKस्थित T4 Education संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित World’s Best School Prizes 2026 च्या Innovation (नवोपक्रम) श्रेणीत जगातील टॉप १० शाळांमध्ये स्थान मिळवले आहे. सरकारी शाळेच्या शिक्षण क्षेत्रातील ही अभिमानास्पद कामगिरी असून, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके निवडण्याचे स्वातंत्र्य, समृद्ध ग्रंथालयाची उभारणी आणि वाचन संस्कृती समाजापर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी प्रयत्नांमुळे हा बहुमान मिळाला.

गेल्या तीन वर्षांत शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या १ हजारांवरून ४ हजारांहून अधिक करण्यात आली आहे. दररोजचा वाचन तास, विद्यार्थ्यांनी स्वतः लिहून प्रकाशित केलेली १०० हून अधिक पुस्तके, तसेच शाळेचा वार्षिक ‘कथाकार’ साहित्य महोत्सव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखनाची सशक्त चळवळ उभी राहिली आहे.

‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेमुळे कासारवाडी परिसरात वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळाली असून अनेक कुटुंबांनी घरगुती ग्रंथालये उभारण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेले हे वाचन मॉडेल आज ५० हून अधिक PCMC शाळांमध्ये यशस्वीपणे राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत १.३८ लाख पुस्तके, ६७७ ग्रंथालय कपाटे, २० हजारांहून अधिक विद्यार्थी, ५०० शिक्षक आणि ५० मुख्याध्यापक सहभागी झाले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक परिजात प्रकाश यांनी सांगितले, “प्रत्येक मुलाला पुस्तकांवर प्रेम करण्याची संधी मिळावी, हा आमचा उद्देश होता. हा सन्मान विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संपूर्ण कासारवाडी समुदायाचा आहे.”

या ऐतिहासिक यशानिमित्त पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, आकांक्षा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ तनेजा तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या जागतिक यशाचा उत्सव साजरा करण्यात आला.

See also  'एक कोटींच्या रोकडीवर डल्ला'; व्यावसायिकाचाच चालक निघाला कटाचा सूत्रधार, पुणे पोलिसांनी उधळला थरारक डाव!

सरकारी शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाचन संस्कृती आणि समुदाय सहभागाला मिळालेली ही जागतिक मान्यता भविष्यात इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!