अश्रूंनी उजळला कॅण्डल मार्च… केतन, तुला न्याय मिळालाच पाहिजे!

बेलोमेंडा लोढा सोसायटी शोकसागरात; प्रत्येक पावलागणिक हुंदके, प्रत्येक डोळ्यात अश्रू…

काशिनाथ शिंदे : गहुंजे

काही घटना अशा असतात की त्या फक्त बातम्या राहत नाहीत, तर हजारो हृदयांची वेदना बनतात. शनिवारी (दि. २७) सायंकाळी गहुंजे येथील उच्चभ्रू बेलोमेंडा लोढा सोसायटीत असेच हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. केतन अग्रवाल याच्या हत्येचा निषेध आणि त्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी हजारो रहिवासी हातात मेणबत्त्या घेऊन शांतपणे रस्त्यावर उतरले. मात्र त्या शांततेतही प्रत्येक पावलागणिक वेदनेचा आक्रोश दडलेला होता.

या वेळी संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता. मेणबत्त्यांचा प्रकाश दिसत होता, पण प्रत्येकाच्या डोळ्यांत दुःखाचा अंधार दाटला होता. अनेक माता आपल्या मुलांना घट्ट मिठी मारून अश्रू ढाळत होत्या. वडिलांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता आणि तरुणांच्या डोळ्यांतील संताप प्रत्येकाला अस्वस्थ करून जात होता. या कॅण्डल मार्चमध्ये केतनचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. मार्च क्लब हाऊसजवळ पोहोचताच केतनच्या आठवणींनी अग्रवाल कुटुंबाचा अश्रूंचा बांध फुटला. त्या आईचा हंबरडा, वडिलांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि कुटुंबीयांची वेदना पाहून उपस्थित हजारो नागरिकही स्वतःचे अश्रू रोखू शकले नाहीत. काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर स्तब्ध झाला.

मार्चमध्ये सहभागी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमत होता आज केतन… उद्या कोण?, तर प्रत्येकाच्या ओठांवर एकच मागणी होती केतनला न्याय मिळालाच पाहिजे!” अनेकांनी भरल्या डोळ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले, “कोणत्याही आई-वडिलांच्या आयुष्यात आपल्या लेकराला अशा प्रकारे गमावण्याची वेळ येऊ नये. ही वेदना शब्दांत मांडता येणार नाही.” हा कॅण्डल मार्च केवळ निषेध नव्हता; तो एका निष्पाप जीवासाठी न्यायाची आर्त हाक होती. हजारो मेणबत्त्या पेटल्या होत्या, पण प्रत्येक ज्योतीमागे एक वेदना, एक अश्रू आणि एकच प्रार्थना होती ती म्हणजे केतनला न्याय मिळू दे… आणि अशी काळी वेळ पुन्हा कोणत्याही कुटुंबावर येऊ नये.”

See also  चाकण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’!
  • Related Posts

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    काशिनाथ पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून,…

    वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

    सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!

    उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराची संधी; चिंचवडमध्ये देशातील पहिले ‘सीड’ केंद्र सुरू!