थेरगावात पहाटेची धडक कारवाई! गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह १८ वर्षीय तरुण जेरबंद

काशिनाथ शिंदे :थेरगाव परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला काळेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २५ जून रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता रॉयल बॅन्क्वेट हॉलसमोरील पवना नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमीन अमिरखान (वय १८, रा. भोरडेनगर, थेरगाव) याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलावर कोणतेही उत्पादकाचे नाव, क्रमांक किंवा ओळख पटविणारे चिन्ह नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई अजय अरुण फल्ले यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ मधील संबंधित कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपी बेकायदा शस्त्र बाळगत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करत आहेत.

काळेवाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

See also  देहू-आळंदी परिसर ‘संत भूमी’ घोषित करण्याची मागणी; वारकरी भाविकांसाठी पायाभूत सुविधांवर भर
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान