रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन देशी पिस्तुले व दोन काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

काशिनाथ शिंदे :पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ ने सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत तीन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपी ओंकार सचिन मोरे (वय २३) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३(२५) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून तीन देशी पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहितस पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

See also  पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!