दारूबंदी पथकाचा धडाका! रेकॉर्डवरील आरोपीला चिखलीत पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दारूबंदी पथकाने अवैध शस्त्रांविरोधातील विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीला चिखली परिसरातून देशी पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केली. या कारवाईत सुमारे 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस फौजदार पलांडे तसेच पोलीस हवालदार पवार, सूर्यवंशी, चव्हाण, पोलीस नाईक गोनटे आणि पोलीस शिपाई खेडकर, पतंगे, देवकर, यादव व पाटील हे अवैध धंदे आणि बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत पेट्रोलिंग करत होते.

यावेळी पोलीस शिपाई खेडकर व पोलीस नाईक गोनटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिखली परिसरातील जाधववाडी ते जाधव सरकार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेजवळ सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान संशयित शिवाजी दुर्गेश कुंचिकर (वय 20, रा. शिवाजीनगर, मरीमाता मंदिराजवळ, देहूरोड, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्या झडतीत एक देशी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि 1 हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 447/2026 नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम 3(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध शस्त्रांविरोधात सातत्याने सुरू असलेल्या मोहिमेत दारूबंदी पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे पोलीस दलात आणि नागरिकांतून कौतुक होत आहे.

See also  पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!