गुन्हे शाखा युनिट-3ची उल्लेखनीय कामगिरी! आळंदीत 337 ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद; स्कुटीसह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे आळंदी,

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-3 ने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 337 ग्रॅम गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत स्कुटीसह एकूण 76 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार श्रीधन इचके, पोलीस अंमलदार निखिल फापाळे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात आणि तुषार वराडे हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार श्रीधन इचके व पोलीस शिपाई निखिल फापाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आळंदी घाट परिसरात सापळा रचण्यात आला.

यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 337 ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विनयदिप गंगाधर मानवते (वय 29, रा. चिंबळी, ता. खेड) आणि इस्माईल मगबुल पठाण (वय 25, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड) अशी आहेत. तसेच या प्रकरणात मनीष (पूर्ण नाव व पत्ता निष्पन्न करावयाचा) हा फरार आरोपी असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

या कारवाईत 16 हजार 850 रुपयांचा 337 ग्रॅम गांजा आणि 60 हजार रुपयांची स्कुटी असा एकूण 76 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार करीत आहेत. अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात गुन्हे शाखा युनिट-3 ने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

See also  रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; तीन देशी पिस्तुले व दोन काडतुसे जप्त, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!