इंद्रायणी नदीकाठी हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट-३चा धडक छापा; २,५०० लिटर रसायन नष्ट, अवैध दारू व्यवसायाला जबरदस्त हादरा!

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत आणखी एक दमदार कामगिरी करत इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २,५०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून, अवैध दारू व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दि. २९ जून २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीधन इचके व दिलीप राठोड  पोलीस शिपाई निखिल फापाळे हे आळंदी  पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार चिंबळी गावातील भूमकर वस्ती परिसरात इंद्रायणी नदीच्या काठी झाडाझुडपांत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन साठवून ठेवण्यात आले होते.

माहितीची खातरजमा करत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. कारवाईदरम्यान २,५०० लिटर रसायन जप्त करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी रोहित प्रताप राठोड (रा. मोई गाव, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध आळंदी  पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-३ची आणखी एक धडाकेबाज कामगिरी म्हणून या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी  पोलीस करत आहेत.

See also  दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!