फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

कामावर जाताना काळाचा घाला; अपघातानंतर डंपरचालक पसार, फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल

काशिनाथ शिंदे

पुणे : पुणे-सासवड मार्गावरील फुरसुंगी येथे भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेदहाच्या सुमारास भोसले व्हिलेजच्या प्रवेशद्वारासमोर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला.

माधुरी सतीश जाधव (वय २३, रा. लक्ष्मी निवास, दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अभिजित ज्ञानदेव जाधव (वय ३१, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हायवा डंपरचालक मनोहर रामदास हाके (वय २९, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, मूळ रा. भरतगाव, हाकेवाडी, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी जाधव या उंड्री येथील एका कंपनीत नोकरीला होत्या. शनिवारी सकाळी त्या अभिजित जाधव यांच्या दुचाकीवरून भेकराईनगर येथून मंतरवाडीकडे कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. भोसले व्हिलेजच्या प्रवेशद्वारासमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हायवा डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील माधुरी खाली पडल्या. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक अभिजित जाधव गंभीर जखमी झाले.

धडक दिल्यानंतर डंपर न थांबवता चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे पुढील तपास करीत आहेत.

भरधाव अवजड वाहनांचा धसका!

कामावर जाणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

See also  महाराष्ट्रात ब्रिटिश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूके-महाराष्ट्र औद्योगिक भागीदारीवर चर्चा
  • Related Posts

    महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

    ठेकेदारांची मोठी कमी दराने बोली; कोट्यवधींच्या कामांच्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निविदांमध्ये ठेकेदारांकडून अंदाजित दरापेक्षा…

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना सक्त इशारा; पुणे परिमंडलात अचानक  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेली वीजजोडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

    महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी

    अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!