उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरील यशस्वी मोर्चाची दखल; राज्यभरातील मातंग समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
काशिनाथ शिंदे
पिंपरी : मातंग समाजाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन मेळावा शालिमार बँक्वेट हॉल येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
शिवशाही शासन पक्ष आणि अखिल भारतीय हिंदू मातंग संघ यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, या मागणीसाठी दिवंगत क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेला मोर्चा यशस्वी करण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल यावेळी घेण्यात आली.
या स्नेहमिलन मेळाव्याला शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उषामाई कांबळे, पदवीधर प्रदेशाध्यक्ष प्रा. उत्तम सकटे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष नानासाहेब कांबळे, अश्विन कांबळे, ज्येष्ठ नेते भगवान शिंदे, हनुमंत नाना कसबे, सुनील भिसे, प्रा. धनंजय भिसे, शिवशाही शासन पक्षाचे माजी अध्यक्ष धनंजय ढावरे, संतोष कांबळे, प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे, शिवशाही माथाडी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन दोनगहू, विजय देवरे, नेताजी शिंदे, नगरसेवक बापू घोलप, शिवाजी चव्हाण, आकाश घोलप, मोहन भिसे आदी उपस्थित होते.
तसेच आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सकल मातंग समाजाचे कार्याध्यक्ष अनिल हतागळे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपावलीच्या आनंदोत्सवाबरोबरच समाजातील एकजूट, सामाजिक प्रश्न आणि संघटनात्मक बांधिलकी अधोरेखित करणारा हा स्नेहमिलन मेळावा उत्साहात पार पडला.






