प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली! सद्गुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही; डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

 

विराट हिंदू मेळाव्यात समाजभूषण, पत्रकार भूषण आणि कार्य गौरव पुरस्कारांचे वितरण

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे  : “अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो, असे श्रीकृष्णाने सांगितले असले, तरी हिंदूंनी आता सद्गुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही. पुन्हा श्रीकृष्ण येण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःमध्ये श्रीकृष्णाचे गुण जागृत करण्याची वेळ आली आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

नवरात्रोत्सव आणि विजयादशमीनिमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) आयोजित हिंदू शौर्य दिनाच्या विराट हिंदू मेळाव्यात डॉ. उपाध्ये ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक एकजूट, देशहित आणि हिंदू समाजाच्या संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले.

मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव

या मेळाव्यात डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०१६’ आणि निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे, समन्वयक कैलास बारणे, मिलिंद एकबोटे, मंदार देशपांडे, चंद्रकांत नखाते, योगिता बारणे, सुरेश भोईर, सुरेंद्र करमचंदानी, सविता एकनाथ नाणेकर, सुजाता पोफळे, महेश कुलकर्णी, अर्थसल्लागार अनुजा घाडगे, अतुल जोशी आदी उपस्थित होते.

देशहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन

डॉ. उपाध्ये म्हणाले की, देशाच्या हितासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बुद्धिवादाच्या नावाखाली साहित्य आणि विचारविश्वात संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. देशासमोरील आव्हानांचा विचार करून समाजाने संघटित राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेजारील देशांतील हिंदूंच्या लोकसंख्येतील बदलांचा आणि भारतातील लोकसंख्याविषयक परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली. शिक्षणातून इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

See also  शासनाच्या योजनांचा लाभ घ्या; शहराच्या विकासातही सहभागी व्हा

‘समाजाची वेदना समजून घ्या’

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभिजीत सोनवणे यांनी वंचित आणि भिक्षेकरी व्यक्तींच्या वैद्यकीय सेवेसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. दुचाकीवर फिरता दवाखाना घेऊन शहरात फिरत गरजूंची वैद्यकीय सेवा केली जाते. तसेच भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींचे कौशल्य ओळखून त्यांना कष्टाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यामुळे नागरिकांनी आपल्याला ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ ही ओळख दिल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. “भक्त मंदिरात देवाकडे मागतात, तर भिक्षेकरी मंदिराबाहेर भक्तांकडे मागतात. या व्यक्तींना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. वेद समजला नाही तरी चालेल; मात्र नागरिकांनी समाजाची वेदना समजून घ्यावी,” असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले.

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानची स्थापना

स्वागत आणि प्रास्ताविक करताना डॉ. उत्तम दंडीमे यांनी संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. गुढीपाडवा, ५ एप्रिल २००० रोजी धर्मवीर आर्य, प्रा. एकनाथ नाणेकर, एस. पी. आर्य, चंद्रकांत जगताप, कुमार पारुल आणि अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानची स्थापना केली. हिंदू धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे, धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालणे, अंधश्रद्धेपासून दूर राहणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हे संस्थेचे प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्याच्या आयोजनात कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर आणि संजय भाट यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले, तर सुहास पोफळे यांनी आभार मानले.

  • Related Posts

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    सायबर पथकाची तत्पर कारवाई; बँक आणि मर्चंटकडे पाठपुरावा करून मिळवले पैसे काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे (प्रतिनिधी) : अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप डाउनलोड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!