“गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!” ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी ताम्हिणी तसेच भोर-वरंधा घाटातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व कोकण खेड युवाशक्तीचे माजी अध्यक्ष रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पूल आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ताम्हिणी आणि भोर-वरंधा घाट मार्गांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो कुटुंबे आपल्या मूळ गावी कोकणात जाणार आहेत. ताम्हिणी आणि भोर-वरंधा हे कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचे मार्ग असले तरी या मार्गांवर मोठे खड्डे, वाहून गेलेले रस्ते आणि सिमेंट रस्त्यांच्या बाजूचा भराव खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन ती उत्सवापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी रुपेश मोरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अतिवृष्टीमुळे कोकणातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून, गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणारे नागरिक घरांची डागडुजी, शेतीची पाहणी आणि कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रवास करणार आहेत. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा आणि सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

“गणरायाच्या आगमनासाठी गावाकडे निघालेल्या प्रत्येक गणेशभक्ताचा प्रवास सुरक्षित होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ताम्हिणी आणि भोर-वरंधा घाटातील रस्त्यांची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी,” अशी अपेक्षा रुपेश मोरे यांनी व्यक्त केली आहे.

See also  तुकाराम मुंढे यांचा ब्लडबँकांवर मोठा प्रहार! २१ ब्लडबँकांचे परवाने निलंबित; २ परवाने कायमचे रद्द
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!