थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवडचा जलवा! ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबावर मोहोर; राज्य निवड चाचणीत सुवर्णपदकांची लयलूट

काशिनाथ शिंदे : लोणावळा

लोणावळा : राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकावला. सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे २४ ते २६ जुलैदरम्यान झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल ४२५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

भारतीय थाई बॉक्सिंग महासंघाच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या अधिपत्याखाली पिंपरी-चिंचवड जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत वेग, तंत्र, आक्रमकता आणि कौशल्याचा थरार अनुभवायला मिळाला. विविध वयोगटांतील चुरशीच्या लढतींमध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांची लयलूट करत आपला दबदबा सिद्ध केला.

सांघिक गटात मुंबई संघाने प्रथम, सातारा जिल्हा संघाने द्वितीय तर सांगली जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावला. गोंदिया जिल्ह्याला शिस्तबद्ध संघाचा विशेष पुरस्कार देण्यात आला. विजेत्या संघांचा चॅम्पियन ट्रॉफी आणि पदकांनी गौरव करण्यात आला.

स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाला राष्ट्रीय थाई बॉक्सिंग संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष पी. वाय. आत्तार, महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अजय खेडगरकर, कार्याध्यक्ष विशाल माळी, टेक्निकल डायरेक्टर वजीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट पंचगिरीबद्दल निशांन चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तर सूत्रसंचालन रविराज गाढवे यांनी केले.

पिंपरी-चिंचवडच्या अद्वैत गायकवाड, अनय पालवे, निधी भोसले, पियुष गुप्ता, जीवन चव्हाण, शौर्यसिंग इंगळे, गौरव शेलार, आर्या बोऱ्हाडे, आर्यन शेंडगे, जान्हवी साबळे, इसक्की तेवर, अपूर्वा टेकाळे, हरीश कुमार, कृष्णा दिवेकर, सूरज भोंडे, अमिन आत्तार आणि अजित जैस्वाल यांनी सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्रातील अव्वल खेळाडू म्हणून आपली छाप पाडली.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे निवड झालेले खेळाडू ६ ते ८ सप्टेंबर २०२६ दरम्यान छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

See also  ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

स्पर्धेचे यशस्वी आयोजन नाजिम शेख, गणेश मांढरे आणि अभिषेक शिंदे यांनी केले. खेळाडूंना प्रशिक्षक गणेश मांढरे, कारभारी गायकवाड, अभिषेक शिंदे, शितल (शंकर) साबळे आणि प्रशांत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राज्यभरातील प्रशिक्षक, पंच आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!