बावधन पोलिसांचा दुहेरी दणका! मोटारसायकल-मोबाईल चोरट्यांची टोळी जेरबंद; ७ गुन्ह्यांची उकल, ३५ लाख नव्हे तर ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे : बावधन पुणे

बावधन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, बावधन, हिंजवडी आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यांतील एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष मोहीम राबवली.

म्हाळुंगे-नांदे रोड परिसरात गस्त घालत असताना नंबर प्लेट नसलेल्या युनिकॉर्न मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत अनिल लहु जाधव (वय २०, रा. म्हाळुंगे) आणि एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग निष्पन्न झाला.

कसून चौकशीदरम्यान अनिल जाधव याने वसंत अंकुश जाधव (वय २५) आणि सुनील लहु जाधव (वय २५, दोघेही रा. सुतारवाडी, ता. मुळशी) यांच्या साथीने बावधन व हिंजवडी परिसरात मोटारसायकल आणि मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमुळे बावधन पोलीस ठाण्याचे चार, हिंजवडी पोलीस ठाण्याचे दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याचा एक असे एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार तसेच बावधन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

See also  पिंपरी-चिंचवडच्या 'रेड झोन' प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!