काशिनाथ शिंदे : कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये सुमारे ६० कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे. जमीन खरेदी, देणग्या, दागिने आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांबाबत विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. विशेषतः जमीन व्यवहार, देणगी निधीचा वापर आणि दागिन्यांच्या नोंदींमध्ये कथित तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपविण्यात आले असून, तपासातून नेमका गैरव्यवहार झाला का, याबाबत सत्य समोर येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, तपास अहवालाकडे भाविकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.







