देहूरोडमध्ये काँग्रेसचा इशारा; कचरा, ड्रेनेज प्रश्नांवर जनआंदोलनाचा इशारा!

काशिनाथ शिंदे : देहूरोड

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील सातही वॉर्डांमध्ये वाढलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन्स आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या प्रश्नांवर देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांना निवेदन सादर केले.

काँग्रेसच्या निवेदनानुसार, शहरातील अनेक भागांत नियमित कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन्समुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

स्वच्छता मोहीम तातडीने राबवून कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, शहराध्यक्ष चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, सचिव गोपाळ वेंकोबा राव, सहसचिव बबन टोम्पे, वेंकटेश विश्वनाथ, विष्णू नरसाप्पा, वेंकटेश मारीमुत्तू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने प्रशासनाला नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, असा स्पष्ट इशारा देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

See also  "गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!" ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!