बोरीवलीत ३.०८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; हत्या प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

 

मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर अँटी

र्कोटिक्स सेलची मोठी कारवाई; नालासोपाऱ्यातून ड्रग्ज आणून मुंबईत विक्रीचा प्रयत्न

काशिनाथ शिंदे

मुंबई: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने बोरीवली पूर्व येथे मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे १ किलो २८ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी २८ वर्षांच्या दोन आणि ३९ वर्षांच्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे तिघेही एका हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नॅशनल पार्कसमोर असलेल्या श्रीकृष्णा कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी नालासोपारा येथून एमडी ड्रग्ज आणून मुंबईत विक्री करण्याच्या उद्देशाने आले होते, असे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२८/२०२६ आणि अँटी नार्कोटिक्स सेलमध्ये गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस ॲक्ट) कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (अँटी नार्कोटिक्स सेल) पौर्णिमा चौगुले-शृंगी आणि सहायक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील व संदीप रहाणे, पोलीस हवालदार संदीप शिंदे, सुभाष चव्हाण, दीप यशवंत, संदीप रावते, किसान गोमासे, पोलीस शिपाई राहुल पंडित, लहू गर्ने, निलेश ठाकूर तसेच पोलीस वाहनचालक हवालदार संदीप वाडिले आणि घाडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

See also  "‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद"

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज विक्रीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर