भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारीवर चर्चा; भविष्यात सामंजस्य करार करण्याबाबत सकारात्मक पाऊल

काशिनाथ शिंदे

पिंपरी: भारत आणि झांबिया या दोन देशांमधील उच्च शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने झांबिया सरकारच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड विद्यापीठाला (पीसीयू) सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे दोन्ही देशांतील शैक्षणिक भागीदारीच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे मत पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य दिनानिमित्त या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झांबिया सरकारच्या शिष्टमंडळातील क्रेडिट्स अँड स्कॉलरशिप्सचे उपसंचालक डेरिक चिसांगा आणि व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा उपस्थित होते.

यावेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे, केनिया येथील विपणन व्यवस्थापक निशा कोटक, आंतरराष्ट्रीय प्रवेश व्यवस्थापक रचना पहुजा, डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान भारत आणि झांबिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी विकसित करणे, विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण वाढविणे, दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भविष्यात दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये दीर्घकालीन सहकार्य निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार करण्याच्या शक्यतेवरही विचारविनिमय झाला.

अशा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आणि संशोधनाचा अनुभव मिळण्याबरोबरच प्राध्यापकांना आपले ज्ञान व कौशल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सामायिक करण्याची संधी मिळणार आहे. तसेच संयुक्त संशोधन, नवकल्पना आणि ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्याचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.

See also  दुधात विषाचा खेळ!' पुणे ग्रामीणमध्ये २.५ कोटींच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १३ जण जेरबंद

पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक शैक्षणिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी पीसीयू सातत्याने प्रयत्नशील असून, भारत आणि झांबिया यांच्यातील ही भेट उच्च शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • Related Posts

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

      कोरियन व्यावसायिक पद्धती, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठेतील संधींची विद्यार्थ्यांना करून दिली ओळख Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, पुणे: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रातील संधी, कोरियन व्यावसायिक संस्कृती…

    २०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर

    लोकमान्य हॉस्पिटलच्या कारभारावर गंभीर आरोप; बांधकाम नियमांचे उल्लंघन, कामगारांची उपेक्षा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबतही संताप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत बांधकामे, बांधकाम परवानग्यांमधील कथित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

    २०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर

    २०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर

    इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

    इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

    *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

    *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!