मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

सम्राटनगर परिसरात मोठी कारवाई; २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ कोटींचे अमली पदार्थ जप्त

काशिनाथ शिंदे

मुंब्रा : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी मोठी कारवाई करत चार विदेशी नागरिकांना अटक केली आहे. सम्राटनगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ कोटी ५० लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे १ किलो ४९९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मुंब्रा पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उघडकीस आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. या प्रकरणी चार विदेशी आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ठाणे पोलिसांनी २०२६ या वर्षात आतापर्यंत अमली पदार्थांच्या गैरव्यवहारप्रकरणी ३९ आरोपींविरोधात कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये सुमारे ३२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ६३५ जणांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली आहे.

अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन यांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात आहे. विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईसोबत जनजागृतीवरही भर दिला आहे.

नशामुक्त ठाणे, सुरक्षित ठाणे!

See also  "मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी मागणी! तत्कालीन अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेच्या उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची जोरदार मागणी"
  • Related Posts

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    काशिनाथ शिंदे सोलापूर : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा ९६ किलो ९१ ग्रॅम गांजा जप्त केला…

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    काशिनाथ शिंदे मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपरिसरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ किलो…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात