“मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मोठी मागणी! तत्कालीन अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेच्या उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची जोरदार मागणी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी

पिंपरी-चिंचवड, मोशी  कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर करून दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात हाके यांनी नमूद केले आहे की, मोशी कचरा डेपोतील संबंधित प्रकल्पाचे नियोजन, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक अंमलबजावणी आणि बांधकामाची प्रक्रिया तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या कार्यकाळात पार पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईन, बांधकामाचा दर्जा, कचरा डेपो परिसरातील भौगोलिक व तांत्रिक बाबी, मंजुरी प्रक्रिया तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व अभिलेखांची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, संबंधित प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्याचे सांगितले जात असल्याने त्या काळात घेण्यात आलेले प्रशासकीय आणि तांत्रिक निर्णय, कामावरील देखरेख तसेच जबाबदाऱ्यांची स्वतंत्र चौकशी करून दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, संपूर्ण मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींची कसून तपासणी करण्यात यावी. चौकशीत कोणताही अधिकारी अथवा संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यांनुसार तातडीने कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

See also  कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचा आधार!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!