सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

काशिनाथ शिंदे

सोलापूर : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा ९६ किलो ९१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आला आहे. मुजमिल अल्ताफ शेख आणि निलोफर इरफान शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दि. २८ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाला भारतनगर परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतनगर क्रीडा संकुल परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित मुजमिल शेख हा प्लास्टिकच्या पिशवीत संशयास्पद वस्तू घेऊन जाताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी मुजमिल याच्या घराची झडती घेतली. यावेळी प्लास्टिकच्या पिशवीत गांजाच्या ४८ पुड्या आढळून आल्या. तसेच त्याच्या माहितीच्या आधारे महिला आरोपी निलोफर इरफान शेख हिच्या घराचीही झडती घेण्यात आली. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ९६ किलो ९१ ग्रॅम गांजा जप्त केला.

जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत ४८ लाख ४५ हजार ५०० रुपये असून, २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केला आहे. जप्त केलेल्या गांजाचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या तपासणीत तो गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) कलम ८(क), २०(ब), २(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या गांजाच्या साठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या विक्रीचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

See also  प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

  • Related Posts

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    सम्राटनगर परिसरात मोठी कारवाई; २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ कोटींचे अमली पदार्थ जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंब्रा : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी…

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    काशिनाथ शिंदे मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपरिसरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ किलो…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात

    जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात