इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपआयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण; देहूरोडमध्ये काँग्रेस कमिटीतर्फेही अभिवादन

 

काशिनाथ शिंदे

पिंपरी : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेऊन देशाची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्याचा संकल्प करण्यात आला.

 

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि उपआयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महानगरपालिकेचे विविध विभागांतील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त उपस्थित मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची, तसेच देशवासीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याची शपथ घेतली.

दरम्यान, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू आणि मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा राणीताई पांडियन, देहूरोड शहर सचिव बबन टोम्पे, ओबीसी सेलचे अध्यक्ष परवेज अत्तार, युवा नेते विष्णू नरसप्पा, वेंकटेश मारीमुत्तू, विश्वास भोसले, प्रवीण भोसले, लोकेश टोम्पे, ज्ञानेश्वर पाटोळे, नरेंद्र गायकवाड, शंकर, तिरुगन्ना संबंधम यांच्यासह महिला कार्यकर्त्या संगीता वर्धा, तावमनी अम्मावशी, कांचन साळुंखे, मालन भोसले आणि राणी नाडार तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  पिंपरी-चिंचवडचा गणेशोत्सव आता जगाच्या व्यासपीठावर!

यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या देशसेवेतील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

  • Related Posts

    *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

    काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि उप आयुक्त संदीप खोत यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी तसेच भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल…

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    सम्राटनगर परिसरात मोठी कारवाई; २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ कोटींचे अमली पदार्थ जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंब्रा : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

    इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ

    *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

    *पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड

    सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड