भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

काशिनाथ शिंदे

पुणे : भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीत पुणे जिल्ह्यातील दोन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीत मागील तीन महिन्यांच्या कालावधीत समितीकडे प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी तसेच त्यावर संबंधित विभागांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तक्रारदारांनी मांडलेल्या मुद्द्यांची माहिती घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडूनही वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली.

या वेळी अर्जदार तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दोन्ही प्रकरणांवर सुनावणी घेतली.

बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी विभागीय स्तरावर दर तीन महिन्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. प्रत्येक तीन महिन्यांत संबंधित महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ही बैठक आयोजित केली जाते. या माध्यमातून तक्रारींचा नियमित आढावा घेऊन संबंधित प्रकरणांवर आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही केली जाते.

See also  दुधात विषाचा खेळ!' पुणे ग्रामीणमध्ये २.५ कोटींच्या दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश; १३ जण जेरबंद
  • Related Posts

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    गुन्हे शाखा युनिट-३ची दमदार कामगिरी; छत्रपती संभाजीनगरातून आरोपी ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहितेवाडी-शेलपिंपळगाव येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे…

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली