एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग

‘माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स’ हा यशाचा मूलमंत्र : डॉ. कीर्ती धारवाडकर

काशिनाथ शिंदे

पिंपरी : एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग आहे. व्यवस्थापनाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित कराव्यात. आजचा विद्यार्थी उद्याच्या मोठ्या आस्थापनांचा व्यवस्थापक आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असून, तो विकसित करण्याचे काम एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करीत आहे, असे प्रतिपादन डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे कॉर्पोरेट वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रन गजेंद्रन यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आरंभ २०२६’ इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन रवींद्रन गजेंद्रन यांच्या हस्ते झाले. यावेळी एमडॉक्स कंपनीचे सॉफ्टवेअर अभियांत्रिकी संचालक रवींदर पाल सिंग, येस बँक समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष समीर मुळे, एम. वूडपीकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक समीर कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर तसेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. कीर्ती धारवाडकर म्हणाल्या, “एमबीए हा विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाला योग्य आकार देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी ‘माऊथ, माईंड, मूड, मनी, मॅनर्स’ हा यशाचा मूलमंत्र लक्षात ठेवून त्यानुसार आचरण करावे.”

रवींदर पाल सिंग यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता आज आपल्या जीवनाचा भाग बनली आहे. विद्यार्थ्यांनी चांगला सादरकर्ता बनण्यासोबतच संशोधन आणि सर्जनशीलतेची क्षमता जपली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत स्वतःचा विकास करा; यश तुमचेच असेल.”

समीर मुळे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक काळात विविध अनुभव घेत व्यवस्थापक म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे आवाहन केले. “मोठे ध्येय ठेवा. स्वतःला एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित ठेवू नका. स्पर्धेत टिकण्यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा,” असे त्यांनी सांगितले.

See also  सुरक्षित वारी... सुरक्षित वारकरी!' : आषाढी वारी २०२६ साठी सोलापूर पोलीसांचा हायटेक सुरक्षा कवच

समीर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला. संपर्क वाढविणे, संवादकौशल्य विकसित करणे, शब्दसंग्रह समृद्ध करणे आणि निरर्थक गोष्टींवर वेळ वाया न घालविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इनोव्हेंट ड्रम सर्कल संस्थेने ‘जम्बेग’ वादनातून विविध सुरांवर संगीत सादर करून विद्यार्थ्यांना अनोखा अनुभव दिला. तसेच ‘व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि आर्थिक निरीक्षण प्रणाली’ या विद्यार्थी संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आरंभ २०२६’चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनात सहयोगी प्रा. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. योगेंद्र देवकर, सहयोगी प्रा. डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. विशाल वाघ आणि सहयोगी प्रा. डॉ. काजल माहेश्वरी यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन व डॉ. प्रणिता बुरबुरे यांनी केले, तर आभार डॉ. काजल माहेश्वरी यांनी मानले.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न