काळेवाडीत गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडक छापा; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

३.९१५ किलो गांजासह दुचाकी, मोबाईल जप्त

पिंपरी, काशिनाथ शिंदे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी परिसरात धडक कारवाई करत एका गांजा विक्रेत्याला अटक केली. आरोपीकडून ३ किलो ९१५ ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अशोक संतोष आडवाणी (वय २८, रा. पवनेश्वर कॉलनी, थेरगाव, पुणे) असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २७ मे रोजी सायंकाळी थेरगाव स्मशानभूमीजवळील लाकूड वखारीसमोर सापळा रचण्यात आला. संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि स्वप्नील चव्हाण, पोउपनि जिलानी मोमीन, महिला पोलीस हवालदार सुषमा पाटील, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, कपिलेश इंगवे, सुभाष गुरव यांनी सहभाग घेतला. तर तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस शिपाई सुभाष गुरव यांनी विशेष मदत केली.

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

See also  आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!