रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

शस्त्रबंदी आदेश झुगारून लोखंडी कोयते बाळगले; दोन्ही तरुणांवर शस्त्र कायद्यान्वये गुन्हे

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही लोखंडी कोयते बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रावेत आणि वाकड परिसरात स्वतंत्र कारवाई करत पोलिसांनी दोन तरुणांकडून लोखंडी कोयते जप्त केले. याप्रकरणी दोघांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रावेतमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून कोयता जप्त

रावेत पोलिसांनी सुरेश कुमार धर्मपाल नेहरा (वय ४४, रा. सक्सेस विंसडोअर टॉवर, रावेत) याच्यावर कारवाई केली. ११ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता नवीन बीआरटी रस्त्यावरील साउथ अप हॉटेलजवळील मस्के वस्ती परिसरात तो लोखंडी कोयता घेऊन उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ८०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शस्त्रे अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नेहरा याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकडमध्ये १८ वर्षीय तरुणाकडून कोयता

दरम्यान, वाकड पोलिसांनीही कारवाई करत स्वराज कैलास ससाणे (वय १८ वर्षेमहिने, रा. मिलन मेडिकलजवळ, शिव कॉलनी, वाकड) याला ताब्यात घेतले. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता शिव कॉलनीतील दत्तमंदिर रस्त्यावर तो लोखंडी कोयता बाळगून असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला. शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही कोयता जवळ बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

See also  मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारणार; कल्याण-डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

या प्रकरणी स्वराज ससाणे याच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्रबंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना कोयते, तलवारी अथवा इतर घातक हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. रावेत आणि वाकडमधील ताज्या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Related Posts

    गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

    दापोली-मंडणगड तालुक्यांसाठी तीन एसटी बसेस; प्रवाशांना पाणी, चालक-वाहकांचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदापोली-मंडणगड : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी दापोली-मंडणगड…

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    वल्लभनगर आगारातून जादा एसटी बसची सुविधा; चालक-वाहकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान, प्रवाशांना आरती पुस्तिकांचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड: गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणातील खेड, रत्नागिरी येथे आपल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

    गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

    ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

    गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम

    गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम

    रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

    रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

    किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप

    किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप