शेतकऱ्यांच्या शेतीपंप केबल चोरीचा पर्दाफाश; वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन चोरटे जेरबंद – तीन गुन्हे उघड, ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

काशिनाथ शिंदे  सातारा

वाठार (ता. कोरेगाव, जि. सातारा) : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील तांब्याच्या केबल चोरून मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना वाठार पोलिसांनी ग्रामसुरक्षा दल व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेच्या मदतीने रंगेहात पकडत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत तब्बल तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच सहा शेतकऱ्यांच्या सुमारे ८३ हजार रुपये किमतीच्या ९६० फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

देऊर (ता. कोरेगाव) येथील मळवी शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या विहिरीवरील सुमारे ७० फूट तांब्याची केबल चोरी करत असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील आणि वाठार पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर वाठार पोलिसांनी केलेल्या सखोल आणि कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी देऊर व तळीये परिसरातील धरणालगत तसेच विहिरीवरील पाणी उपसा पंपांना जोडलेल्या तांब्याच्या केबल चोरीच्या आणखी अनेक घटना कबूल केल्या.

या तपासातून वाठार पोलीस ठाण्यातील तीन मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेल्या सहा शेतकऱ्यांच्या ८३ हजार रुपये किमतीच्या सुमारे ९६० फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहायक फौजदार वाघमारे, काळे, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, अमोल कर्णे, सहदेव तुपे, अजय झुंजार, आनंदराव भोसले, सर्जेराव सुळ, धिरज यादव, विवेक शिंदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रतीक देशमुख, आधिक शेलार आणि एकनाथ सरगर यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल कर्णे, सहदेव तुपे आणि अजय झुंजार करीत आहेत.

See also  प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून; फरार आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद

दरम्यान, वाठार पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेच्या गुन्ह्यांबाबत संशयास्पद हालचाली किंवा माहिती आढळल्यास ती गोपनीयरीत्या पोलिसांना कळवावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी नागरिकांना केले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!