“मोशी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मृतांच्या कुटुंबीयांना तातडीच्या मदतीचे आदेश, कचरा व्यवस्थापनावर कठोर निर्देश!”

काशिनाथ शिंदे  पिंपरी चिंचवड

मोशी (पिंपरी-चिंचवड) : मोशी येथील घनकचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बचावकार्याची माहिती देताना, हे अभियान आज रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.

या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे आदेश दिले. तसेच, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे एक हजार टन कचऱ्यावर त्वरित प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र, सक्षम व प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोशी दुर्घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेगाने काम सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत.

See also  दिव्यांग महिलेवरील अमानुष अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!