Team DakshTimes: Kashinath Shinde
गुरुवर्य रंजिता नायक जी व गुरुवर्य रवी नायक जी यांच्या आशीर्वादाने अस्तित्व किन्नर आखाडा, पुणे यांच्या वतीने गुरुवर्य अमित बाबा मस्के जगवाले (निगडीवाले) यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे भव्य दिव्य चैत्र पौर्णिमा येडीश्वरी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
तुळजापूर येथे छबिन्याचा कार्यक्रम, चुन्याच्या रानामध्ये आईचा हळदीचा विधी तसेच विढ्या व आईच्या राशीवर नैवेद्य अर्पण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या आईच्या पालखी सोहळ्यावेळी येडेश्वरी हलगी ग्रुपच्या अमर हीरनायक, सागर यादव, कुमार कुऱ्हाडे, दिगंबर लोंढे, गणेश काळभोर, विवेक शिंदे, अर्जुन बाबा शिंदे, ओंकार मेघ व सिद्धार्थ सोनवणे यांनी हलगी वादन करत पालखीचे जल्लोषात स्वागत केले.
तसेच तेजस भाऊ मस्के युवा प्रतिष्ठान गोशाळा, नागेश्वर शिव मंदिर एकतरी भजनी मंडळ (रुपीनगर) व उमेश्वर संतसंग भजनी मंडळ (अजंठा नगर) यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
या यात्रेत हिरामण खवळे, रविभाऊ ससाने, संग्राम सोळंकी, सचिन मस्के, संजय सोळंकी, बबलू भालेराव, अरविंद शेलार व जगविंदर पाजी आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक जल्लोषात यशस्वीरित्या पार पडला.
