Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखा युनिट-३ ने वेगवान कारवाई करत रिक्षा चोरी करून तसेच मोबाइल फोन व रोख रक्कम हिसकावुन घेवुन पळालेल्या आरोपीस अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपीकडून एकूण १,०७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६४/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९ (६) अन्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, तुषार वराडे, निखील फापाळे व राजकुमार इघारे यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे भोसरी येथे संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीचे नाव हरीश विनोद कदम (वय २०, रा. बिबेवाडी, पुणे) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ५,००० रुपयांचा मोबाईल फोन व जबरी चोरीतील २,०५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याने सहकारनगर येथून रिक्षा (क्रमांक MH12 SK 4967) चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित रिक्षा उर्से टोलनाका परिसरातून जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.
तपासादरम्यान आरोपीने विश्रांतवाडी ते आळंदी रोडवरील वडमुखवाडी (दिघी) येथे कारमधील चालकाकडून १०,००० रुपयांचा मोबाईल हिसकावून चोरी केल्याचेही उघड झाले. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच रिक्षा चोरीबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंद आहे.
या कारवाईत भोसरी एमआयडीसी, सहकारनगर व दिघी येथील एकूण तीन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. आरोपीकडून चोरीस वापरलेली रिक्षा, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १,०७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सचिन गोनटे, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखील फापाळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेतील कर्मचारी माळी यांनी पार पाडली.









Leave a Reply