Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी-चिंचवड, २३ मार्च :
पिंपरी येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित खिवसरा पाटील शिक्षण संकुल (थेरगाव) येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गरजा समजून घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे मोलाचे सहकार्य लाभले. रोटरीचे अध्यक्ष श्री. भरत चव्हाण आणि माजी अध्यक्ष श्री. जगदाळे सर यांच्या विशेष पुढाकारामुळे डब्ल्यूटीई या शाळेला सहाय्य करू शकली.
याप्रसंगी शाळेला ७५ इंची अत्याधुनिक ‘इंटरॅक्टिव्ह पॅनल’, ७० वाकडी (डेस्क) आणि कुस्तीगीर मुला-मुलींच्या सरावासाठी दर्जेदार ‘रेसलिंग मॅट’ प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘क्रांतीगीताने’ उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी डब्ल्यूटीईचे जनरल मॅनेजर (फायनान्स) श्री. विवेक जोशी आणि एच.आर. मॅनेजर सौ. कावेरी चव्हाण आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी चे सेक्रेटरी रो. श्री वसंत ढवळे हेही उपस्थित होते .
विकासासाठी सामाजिक बांधिलकीचे आवाहन डब्ल्यूटीई समूह पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. केवळ व्यावसायिक प्रगतीच नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचाव्यात, हाच या उपक्रमाचा हेतू आहे. समाजातील इतर घटक आणि संस्थांनीही अशाच प्रकारे पुढाकार घेऊन शहराच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले.










Leave a Reply