शिवरायांच्या जयघोषात बर्गे प्रतिष्ठानचा भव्य शिवजयंती रथोत्सव; राज्यभरातील बर्गे घराण्यातील मान्यवरांच्या एकजुटीचे पुण्यात दर्शन

शिवरायांच्या जयघोषात बर्गे प्रतिष्ठानचा भव्य शिवजयंती रथोत्स

राज्यभरातील बर्गे घराण्यातील मान्यवरांच्या एकजुटीचे पुण्यात दर्शन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शनिवारवाडा आणि लालमहाल परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिवकालीन वातावरणाचा अनुभव देणाऱ्या ऐतिहासिक देखाव्यांसह यंदाचा शिवजयंती रथोत्सव उत्साहात पार पडला. श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात स्वराज्यासाठी देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या वीर शिलेदारांचा ऐतिहासिक देखावा सादर करण्यात आला.

प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निवृत्त सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे व उपजिल्हाधिकारी मधुसुदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पुणे, कोरेगाव, चिंचनेर, आंबेवाडी, सातारा, सांगली, अहिल्यानगर, बीड तसेच महाराष्ट्रभर वास्तव्य करणारे बर्गे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

शिवजयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील गोशाळेला पाच हजार एक रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. तसेच परिवारातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहावी आणि शिक्षण, शेती व व्यवसाय क्षेत्रात प्रगतशील व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

इतिहास अभ्यासक पांडुरंग सुतार व पोपटराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संवर्धन व अभ्यासाचे विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देण्यात आली. सोहळ्यास पुण्यातील सहकार तज्ज्ञ अॅड. अजित बाेराडे, कोरेगाव नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, नगरसेवक प्रा. एस. एस. बर्गे, अॅड. चंद्रशेखर बर्गे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

————-

See also  पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्रांती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!