Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हिंदू मातंग सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सर्व कामगार बांधवांना विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिलेबी वाटप करून मातंग समाजाच्या व इतर पोट जातींच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अ ब क ड लागु करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी हिंदू मातंग सेना संस्थापक प्रमुख अरूण जोगदंड, सचिव संजय ससाणे, मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले, सदस्य हनुमंत उर्फ नानासाहेब कसबे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, हिंदू मातंग सेनेचे सदस्य तथा शिवशाही कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश कलवले, माणिक माने,किरण कांबळे,राहूल जाधव, संभाजी पवार, सुखदेव अडागळे, विशाल पवार, राहुल जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
