Team DakshTimes: Kashinath Shinde
पिंपरी : बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरण रोड येथील बसवेश्वर महाराजांच्या स्मारकास मातंग समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विविध सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष व मार्गदर्शक डी. पी. खंडाळे, आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष तसेच बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय नाना धुतडमल, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तसेच हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते व कार्यकारी प्रमुख युवराज दाखले उपस्थित होते.
तसेच उद्योजक अनिल दादा गायकवाड, अध्यक्ष रामदास कांबळे, मांगल्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे, आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाचे अध्यक्ष गणेश कलवले, तसेच सुरज आण्णा कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बसवेश्वर महाराजांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देण्यात आली.
