भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी; पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित

काशिनाथ शिंदे

पुणे / भीमाशंकर : भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या वेळी प्रस्तावित वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान, जैवविविधतेला निर्माण होणारा धोका आणि निसर्गसंपत्तीच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित टोरेंट प्रकल्पाला काँग्रेसने विरोध दर्शविला. पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.

भीमाशंकरसारख्या नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरातील वृक्षसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गसंपत्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणीवेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहूअण्णा निवगुणे, मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहळ, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, सचिव बबन टोम्पे, किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजन, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुसळे, युवा नेते वेंकटेश मारीमुत्तू, योगेश टाकळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भीमाशंकरच्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण आणि प्रस्तावित टोरेंट प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी यापुढेही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

See also  कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
  • Related Posts

    फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती

    भारतासह चार देशांतील व्यवसायाचा विस्तार; २०० कोटींच्या महसूल असलेल्या आयटी कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू काशिनाथशिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : जपानमध्ये तंत्रज्ञान सेवा आणि भाषा सोल्यूशन्स क्षेत्रात…

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    १४ नोव्हेंबरला लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव; लोकसेवक युवराज दाखले यांची समाजबांधवांना साद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती

    फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

    न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

    पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर

    पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर